Bhiwandi: भिवंडीत बांगलादेशी नागरिकास अटक
By नितीन पंडित | Published: August 19, 2023 08:15 PM2023-08-19T20:15:09+5:302023-08-19T20:15:57+5:30
Bhiwandi: भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही कागदपत्र नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय बांगलादेशी युवकास कोनगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
- नितीन पंडित
भिवंडी : भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही कागदपत्र नसताना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात येऊन भिवंडीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय बांगलादेशी युवकास कोनगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
नूरहुसेन अब्दुल सलाम शेख वय ३२ वर्ष असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. तो भिवंडीतील पिंपळघर येथे एका चाळीत राहून प्लँबरचे काम करत होता.त्याच्यावर संशय आल्याने कोनगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे आढळले नाही.तो बांगलादेश येथील चट्टाग्राम जिल्ह्यातील नानुपूर फोटीकसरी येथील रहिवासी असल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असणारे पारपत्र विजा व आवश्यक कागदपत्र नसल्याचे तपासात समोर आल्याने त्याच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.