भिवंडीत लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

By नितीन पंडित | Published: January 30, 2024 07:14 PM2024-01-30T19:14:25+5:302024-01-30T19:14:35+5:30

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी व कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पवार याने अनिकेतच्या आई कडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती.

Bhiwandi bribe-taking assistant police inspector in anti-corruption net, arrested red-handed while taking bribe of two lakhs | भिवंडीत लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

भिवंडीत लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

भिवंडी: नारपोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलिस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २५ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १६ वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ७  डिसेंबर रोजी उघड झाला होता. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी व कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पवार याने अनिकेतच्या आई कडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर महिलेने त्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना रंगेहाथ पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Bhiwandi bribe-taking assistant police inspector in anti-corruption net, arrested red-handed while taking bribe of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.