दुर्घटनेतून वाचलो, आता खायचे काय?; जखमी हमालांना पोट भरण्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:40 AM2023-05-01T07:40:13+5:302023-05-01T07:40:38+5:30

शनिवारी पहाटे पाचपासून दोन कंटेनर माल या हमालांनी खाली केला

Bhiwandi Building Collapse: Survived the accident, now what to eat?; Concerned about feeding wounded attackers | दुर्घटनेतून वाचलो, आता खायचे काय?; जखमी हमालांना पोट भरण्याची चिंता

दुर्घटनेतून वाचलो, आता खायचे काय?; जखमी हमालांना पोट भरण्याची चिंता

googlenewsNext

भिवंडी - इमारत दुर्घटनेतून वाचलेल्या जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मात्र दोन दिवसांपासून या जखमी कामगारांकडे कंपनीच्या मालकासह मॅनेजर आणि इतर कोणीही फिरकले नाही. त्यामुळे दुर्घटनेतून वाचलो. मात्र,  कुठे राहायचे, कुठे खायचे, कसे जगायचे, असा प्रश्न  कामगारांना सतावतो आहे.

बचाव पथकाने उदयभान यादव (वय ३०), मुख्तार मन्सुरी (२७) या दोन कामगारांना शनिवारी सुखरूप बाहेर काढले. हे दोन्ही कामगार दुर्घटनाग्रस्त इमारतीत असलेल्या एमआरके फूड्स कंपनीत हमालीचे काम करत होते. शनिवारी पहाटे पाचपासून दोन कंटेनर माल या हमालांनी खाली केला. अवघे सहा सात बॉक्स शिल्लक राहिले असताना अचानक इमारत कोसळली.

Web Title: Bhiwandi Building Collapse: Survived the accident, now what to eat?; Concerned about feeding wounded attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.