भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण

By नितीन पंडित | Published: August 20, 2022 11:50 PM2022-08-20T23:50:48+5:302022-08-20T23:51:11+5:30

पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून चौघांनाही अटक केली आहे.

Bhiwandi central intelligence department employee beaten up over Ganeshotsav registration | भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण

भिवंडी केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यास गणेशोत्सव वर्गणीवरून मारहाण

googlenewsNext

भिवंडी- सार्वजनिक गणेशोत्सवाची वर्गणी न देणाऱ्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यास गणेशोत्सव मंडळातील तरुणांनी बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना भिवंडीत शुक्रवारी घडली आहे . याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय गुप्त वार्ता विभागाचे भिवंडी टेमघर येथील एका इमारतीत कार्यालय असून दहीहंडी निमित्त शहरात मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री भिवंडी शहरात येत असताना सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवून असलेले केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे निरीक्षक कुंदनसिंग रावत हे कार्यालयात बसून काम करीत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी टेमघर परिसरातील साईश्रद्धा मित्र मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी येऊन जबरदस्तीने वर्गणी मागू लागले. यावेळी कुंदनसिंग रावत यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने कार्यकर्त्याना राग अनावर होऊन त्यांनी कुंदनसिंग रावत यांना ठोश्याने तोंडावर व शरीरावर मारहाण करीत जीवेठार मारण्याचे उद्देशाने त्यांचा गळा आवळून बेशुध्द करून पळून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी कुंदनसिंग रावत यांना उपचारासाठी प्रथम शासकीय व त्या नंतर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. शांतीनगर पोलिसांनी तातडीने शोध घेऊन मंडळाचे पदाधिकारी विश्वनाथ बाळाराम पाटील वय ३६, प्रतिक विलास बोरसे वय २६, सुनिल राधाकिशन राहुलवार वय ३३, जतिशर मेशफुलोरे वय २७,सागर पंढरीनाथ पाटील वय २५ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करून चौघांनाही अटक केली आहे.
 

Web Title: Bhiwandi central intelligence department employee beaten up over Ganeshotsav registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.