भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:27 PM2020-08-19T23:27:49+5:302020-08-19T23:28:41+5:30

लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ऑनलाइन महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली.

Bhiwandi city housing and water strip pardoned for three months; Mayor's announcement at the online general meeting | भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा

भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा

Next

भिवंडी  - करोना संसर्ग टाळण्यासाठी बुधवारी भिवंडी महानगरपालिका सभागृहात महासभा सभेच्या विषय पत्रिके वरील नियोजित लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ऑनलाइन महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली.  

यावेळी प्रत्यक्ष सभागृहात महापौर प्रतिभा पाटील , उपमहापौर इम्रान खान, आयुक्त पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेता यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील , सचिव अनिल प्रधान यांसह नागरसेवक संतोष शेट्टी, अरुण राऊत, संजय म्हात्रे, डॉ.जुबेर, प्रकाश टावरे,मुख्तार खान, इत्यादी सदस्य सभागृहात उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेतील कोरोना व लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा विषय पत्रिकेतील चर्चा सुरू झाली.त्या मध्ये स्थायी सभापती हलीम अन्सारी यांनी चर्चेला सुरुवात केली.त्यास सभागृह नेता विलास पाटील यांनी अनुमोदन दिले.ऑनलाईन झूम अँप द्वारे नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ति, जावेद दळवी, मनोज काटेकर, मदन बुवा नाईक, रिषिका राका,सिराज ताहीर, प्रशांत लाड चर्चेत सहभागी झाले होते. महापौर यांनी सांगितले की, कोरोना लॉक डाऊन काळात शहरातील व्यापारी, करदाते, गरीब नागरिक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही.

शहरातील नागरिक यांना थोडासा तरी आर्थिक दिलासा देणे हे महानगरपालिकेच्या मुख्य काम आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील नागरिकांना तीन महिने मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तरी प्रशासनाने त्या प्रमाणे कारवाई करावी याबाबत महापौर यांनी आदेश प्रशासनास दिले. तसेच संपूर्ण शहरातील नागरिक सेवा भावी संस्था, गरीब गरजू यांना मदत करणाऱ्या संस्था, मोहल्ला क्लिनिक सुरू करून वैद्यकीय व्यावसायिक, अन्य नागरिक, महापालिका सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे या शहरवासिय यांनी चांगले काम केले आहे. सर्व शहर वासीय यांचे महापौरांनी आभार मानले.

Web Title: Bhiwandi city housing and water strip pardoned for three months; Mayor's announcement at the online general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.