भिवंडीत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पंचसूत्री कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:36 AM2020-06-25T00:36:26+5:302020-06-25T00:36:33+5:30

प्रतिबंधित क्षेत्रातील जनजागृती करणे आणि यासाठी सामाजिक संस्था, दक्ष नागरिकांची मदत घेणे, असा पंचसूत्री कार्यक्रम आयुक्तांनी सादर केला.

Bhiwandi Commissioner Dr. Pankaj Asia's Panchasutri program | भिवंडीत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पंचसूत्री कार्यक्रम

भिवंडीत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पंचसूत्री कार्यक्रम

Next

भिवंडी : कोरोनाविषयक परिस्थितीत शहरात १० दिवसांत सुधारणा दिसेल, असा विश्वास नवनियुक्त आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यासाठी पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या पंचसूत्रीनुसार चांगल्या उपचारांसाठी रुग्णालयांच्या सुविधांकडे लक्ष देण्यात येणार आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करणे, रुग्णाच्या परिसरात घरोघरी सर्वेक्षण करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील जनजागृती करणे आणि यासाठी सामाजिक संस्था, दक्ष नागरिकांची मदत घेणे, असा पंचसूत्री कार्यक्रम आयुक्तांनी सादर केला.
>मालेगावात केले प्रभावी काम
मालेगाव येथे प्रभावी काम करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यशस्वी झालेले डॉ. आशिया यांची भिवंडीतील परिस्थिती हाताळण्यासाठी आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तीन दिवस येथील कामकाजाचा व उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली.
>1000 बेडचे विलगीकरण केंद्र
नागरिकांसाठी १० रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून त्यासाठी आवश्यक कर्मचारी घेतले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. येत्या तीन ते चार दिवसांत शहरात एक हजार बेडचे विलगीकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Bhiwandi Commissioner Dr. Pankaj Asia's Panchasutri program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.