भिवंडीत घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यातील त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक
By नितीन पंडित | Published: November 24, 2023 04:51 PM2023-11-24T16:51:25+5:302023-11-24T16:51:56+5:30
चोरांकडून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भिवंडी : परिसरात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांसह घरफोडी मोठ्या संख्येने वाढ झाली असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी गुन्हे शाखेने त्रिकुटास अटक करून त्यांच्या जवळून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करीत दहा गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले .या पथकातील पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवमंगल इश्वरदिन मिश्रा उर्फ सागर,वय ४० वर्षे, शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान, वय ४५ वर्षे,दोघे रा.कल्याण रोड, टेमघर,भिवंडी,अमान फुरकान खान,वय ३० वर्षे,रा.मानपाडा, बेतवडे गांव,ता. कल्याण यांना अटक करण्यात आली.त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी नारपोली,कोनगांव व पडघा या पोलिस ठाणे हद्दीत केलेले घरफोडी, वाहन चोरी चे गुन्हे उघडकीस आणले आहेत.या टोळक्या कडून नारपोली पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले १३ लाख किमतीचे तीन टेम्पो व इतर घरफोडीच्या गुन्ह्यातील असा एकूण ३९ लाख ४० हजार ८१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .