घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक

By नितीन पंडित | Published: February 1, 2024 05:54 PM2024-02-01T17:54:49+5:302024-02-01T17:55:08+5:30

गिरीश सुनील तपासे वय ३५ वर्ष, रा. हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Bhiwandi Crime Branch succeeded in seizing property worth eleven lakhs from burglary; Arrested one | घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक

घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक

भिवंडी : गोदामातील शटर तोडून गोदामात साठवलेला पीव्हीसी इलेक्ट्रिकल इन्सुलेशन असा दहा लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जानेवारी रोजी दापोडा येथील गोदामात घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने या घरफोडी प्रकरणातील आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून घरफोडी केलेला १० लाख ८० हजार रुपये किमतीचा सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने गुरुवारी दिली आहे. गिरीश सुनील तपासे वय ३५ वर्ष, रा. हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

        तालुक्यातील दापोडे येथील जय श्रीराम कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलनात असलेल्या ग्लू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून १० लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरला होता.याप्रकरणी कंपनीतील सहकारी प्रद्युम्न प्रकाश जाधव यांनी २६ जानेवारी रोजी नारपोली पोलिस ठाण्यात गोदामातून घरफोडीची तक्रार दाखल केली होती.या घटनेचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा २ कडून करण्यात होता. गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून गिरीश  तपासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याचे कबूल दिली असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दहा लाख ८० हजार रुपये किमतीचे पीव्हीसी इलेक्ट्रॉनिक इन्सुलेशन टेप रोलचे एकूण २४० बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीस अटक केली आहे.

     सदरची कामगिरी गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,धनराज केदार, सचिन ढोके, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस हवालदार साबीर शेख,किशोर थोरात, पो.ना. सचिन जाधव, पो.शि. सचिन सोनवणे, पो.शि. उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांनी केली आहे.
 

 

Web Title: Bhiwandi Crime Branch succeeded in seizing property worth eleven lakhs from burglary; Arrested one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.