भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:30 AM2019-05-08T01:30:26+5:302019-05-08T01:30:40+5:30

भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला.

Bhiwandi-Dombivali road 30m Extensive, MMRDA transcript to save the cost | भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

googlenewsNext

- नारायण जाधव
ठाणे  - भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. भूसंपादनाअभावी तो रखडलेला असतानाच आता खर्च वाचविण्यासाठी त्याची रुंदीच तब्बल १५ मीटरने कमी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे हा रस्ता ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचाच बांधण्यात येणार असून शिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून बांधण्यात येणारा सेवा रस्ताही त्यातून वगळला आहे. यामुळे या रस्त्याचा खर्च ४५० कोटी ६० लाखावरून थेट १६० कोटी ९८ लाखांवर आला आहे. यामुळे एमएमआरडीएच्या तब्बल २८९ कोटी ६२ लाख रुपयांची बचत होणार आहे.

सध्या भिवंडीहून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमार्गे जावे लागते. यात वेळ, श्रम, पैसा तर खर्च होतोच शिवाय वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. आपत्कालिन परिस्थितीत तर अनेक अडचणी येतात. यामुळे भिवंडीहून माणकोली-मोठागाव दरम्यान खाडीत पूल बांधून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर म्हणजे सीआरझेडसह पर्यावरण खात्याची मंजुरी, भूसंपादनाचा होता. यासाठी मोठ्याप्रमाणात पैसा लागणार आहे. यामुळे खर्चात बचत करण्यासाठी एमएमआरडीएने सेवा रस्ता वगळण्यासह त्याची रुंदी कमी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

हा पूल झाल्यानंतर डोंबिवलीहून थेट मुंबई-नाशिक महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे डोंबिवलीहून भिवंडीसह ठाणे, मुंबईसह वसई-विरार आणि नाशिक या महानगरांतील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. यात मोठ्याप्रमाणात इंधन बचत होईल. शिवाय कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

भिवंडीतील गोदामपट्टा हा मानकोली, काल्हेर परिसरात असल्याने डोंबिवली एमआयडीसी थेट या भागात जोडली जाऊन तेथील उद्योजकांच्या मालवाहतुकीवरील खर्चात बचत होणार आहे.

भूसंपादनासाठी मोजणार सुमारे ७३ कोटी रूपये

माणकोली ते उल्हासखाडीवरील ३० मीटर रुंद आणि ३.३० किमी लांबीचा पूल ४१ कोटी
मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली येथील इंटरचेंजची कामे (उजवे वळण वगळून) २० कोटी
एक भूयारी मार्ग बांधण्यासाठीचा खर्च १५ कोटी
सल्लागार शुल्क १.३८ कोटी
आकस्मिक खर्च ३.४५ कोटी
सेवा वाहिन्या स्थलांतरीत करणे ६.९० कोटी
भूसंपादन खर्च ७३.२५ कोटी
एकूण १६०.९८ कोटी

नव्या निर्णयानुसार असा वाचेल खर्च

तीनऐवजी एकच भूयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचे भूसंपादन करून तेवढाच रस्ता बांधण्यात येईल
दोन्ही बाजूच्या साडेसात मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम वगळण्यात आले आहे.
माणकोली जंक्शनजवळील उजव्या वळण्यासाठी केलेली इंटरचेंजची तरतूद पूर्णपणे वगळली आहे.

Web Title: Bhiwandi-Dombivali road 30m Extensive, MMRDA transcript to save the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.