भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
By नितीन पंडित | Published: April 14, 2023 06:23 PM2023-04-14T18:23:50+5:302023-04-14T18:24:40+5:30
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भिवंडी -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३२ वी जयंती भिवंडीत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. भिवंडी महापालिकेत प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि मुख्यालयातील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप-आयुक्त दिपक पुजारी, माजी नगरसेवक विकास निकम,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शाहूराज साठे आदी उपस्थित होते.
त्यांनतर भिवंडी महापालिकेतर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुने मुख्यालय, डॉ. आंबेडकर वाचनालय, अंजूरफाटा येथील अर्थ पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शहरातील सर्वच शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून भीम जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील वडघर येथे पंचशील मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाबरोबरच लहान मुलांसाठी संस्कृती कार्यक्रम तसेच स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती. ग्रामीण भागात खारबाव,पूर्णा,राहनाळ, काल्हेर ,कशेळी, अनगाव,कवाड,शेलार,मीठपाडा,पारिवाली,सुपेगाव, अंबाडी अशा विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.