भिवंडीत दारूच्या नशेत टेरेसवरून उडी मारणारा बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:26 AM2021-06-20T04:26:52+5:302021-06-20T04:26:52+5:30

भिवंडी : भिवंडी कल्याण महामार्गावरील गोवे नाका येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्राणायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या टेरेसवरून एका दारुड्याने शनिवारी उडी ...

In Bhiwandi, a drunken jumper escaped from the terrace | भिवंडीत दारूच्या नशेत टेरेसवरून उडी मारणारा बचावला

भिवंडीत दारूच्या नशेत टेरेसवरून उडी मारणारा बचावला

Next

भिवंडी : भिवंडी कल्याण महामार्गावरील गोवे नाका येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्राणायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या टेरेसवरून एका दारुड्याने शनिवारी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सदर व्यक्ती उडी मारल्यानंतर इमारतीच्या प्रवेशद्वारावरील छतावर पडल्याने तो बचावला. विनयकुमार कुशवाह (वय २४ रा.पिंपळघर ) असे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेची माहिती कळताच भिवंडी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुमारे चाळीस फूट उंचीवर अडकून पडलेल्या व्यक्तीस क्रेनच्या मदतीने खाली उतरवत त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.

सदरच्या दारुड्याची उडी चुकल्याने व कमी उंचीवर पडल्याने त्यास किरकोळ दुखापत झाली. कुशवाह याला प्राणायु हॉस्पिटल येथेच प्रथमोपचार केल्यानंतर कोनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने पोलिसांनी कुशवाहचा जबाब नोंदवून त्यास समज देऊन सोडून दिले.

...........

वाचली

Web Title: In Bhiwandi, a drunken jumper escaped from the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.