Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ

By नितीन पंडित | Published: November 22, 2023 06:21 PM2023-11-22T18:21:06+5:302023-11-22T18:23:52+5:30

Bhiwandi News: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न गाठ बांधल्याने हा विवाह सोहळा भिवंडीत आदर्श विवाह सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरली असून या विवाहाची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Bhiwandi: In Bhiwandi, a marriage knot was tied after reading the Constitution Preamble | Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ

Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ

- नितीन पंडित
भिवंडी - भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न गाठ बांधल्याने हा विवाह सोहळा भिवंडीत आदर्श विवाह सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरली असून या विवाहाची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

भिवंडीतील शेलार गावातील मल्हारी कांबळे यांच्या मुलीचे लग्न रविवारी कवाड येथील एका फार्म हाऊसवर आयोजित केले होते. या लग्न सोहळ्यात नवदापत्यांनी आपल्या विवाहाची लग्न गाठ बांधताना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न केले आहे. एमबीएच शिक्षण पूर्ण केलेल्या अर्चना मल्हारी कांबळे व भारतीय सैन्य दलात असलेले दत्तवाड शिरोळ तालुक्यातील अमर रंगराव कांबळे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकाच्या वाचन करून आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे. या विवाह सोहळ्याची संपूर्ण भिवंडी तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे. अर्चना व अमर यांनी बौद्ध पद्धतीने लग्न केले असून त्यांनी मंगलाष्ट गाथा ऐवजी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न केले आहे. या लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी सुद्धा उभे राहून वधू व वराच्या सोबत उद्देशिकाचं वाचन करून त्यांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. या आदर्श विवाह सोहळ्याची संपूर्ण भिवंडी तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Bhiwandi: In Bhiwandi, a marriage knot was tied after reading the Constitution Preamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.