परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा

By नितीन पंडित | Published: October 1, 2022 04:37 PM2022-10-01T16:37:17+5:302022-10-01T16:37:44+5:30

दीड तासांच्या मुसळधार पावसात रस्ते झाले जलमय

Bhiwandi is lashed by heavy rains, traffic jams due to waterlogging | परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा

परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा

Next

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क- भिवंडी: सप्टेंबर महिन्यात पावसाने अनेकांची दाणादाण उडवली असताना ऑक्टोंबर महिन्यापासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज खरे ठरवीत एक आक्टोंबर रोजी परतीचा पावसाने भिवंडी शहरात दमदार हजेरी लावली. दुपारी दीड तास पडलेल्या मुसळधार पावसामध्ये शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.

भिवंडी कल्याण रस्त्यावरील राजनोली नाका, गोवे नाका येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.याचा फटका एका सीएनजी पंपावरील वाहनांना सुद्धा बसला.तर शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, अंजुरफाटा , कल्याण नाका आदी परिसरात देखील पाणी साचल्याने प्रवाशांची दैना उडालेली पाहायला मिळाली.

Web Title: Bhiwandi is lashed by heavy rains, traffic jams due to waterlogging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.