भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाचे कपिल पाटील आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:46 AM2019-05-23T11:46:06+5:302019-05-23T11:55:05+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
भिवंडी - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये कपिल पाटील यांना 74 हजार 568 मते मिळाली असून, काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्या पारड्यात आतापर्यंत 56 हजार 310 मते मतं पडली आहेत.
शहरी, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, परप्रांतीय अशी बहुरंगी लोकसंख्या असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूने कौल देतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यामध्ये लढत झाली आहे. कपिल पाटील यांच्याविरोधात मतदार आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे असलेले लक्षणीय प्रमाण यामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाणार असे बोलले जात होते. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालामध्ये कपिल पाटील हे विजय मिळवतात, की सुरेश टावरे विजय मिळवतात, याचीच चर्चा आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपाच्या कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 070 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना यांना 3 लाख 01 हजार 620 मतं मिळाली होती.