भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना लढवणार, परिवर्तन मेळाव्यात सांबरेंचे शक्ती प्रदर्शन

By नितीन पंडित | Published: January 19, 2024 08:14 PM2024-01-19T20:14:31+5:302024-01-19T20:14:47+5:30

भिवंडी : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिजाऊ सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे निवडणूक लढविण्यासाठी ...

Bhiwandi Lok Sabha Jijau organization to contest, show of power of Sambars in Parivartan Mela | भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना लढवणार, परिवर्तन मेळाव्यात सांबरेंचे शक्ती प्रदर्शन

भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना लढवणार, परिवर्तन मेळाव्यात सांबरेंचे शक्ती प्रदर्शन

भिवंडी: लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिजाऊ सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून शुक्रवारी भिवंडीतील परिवर्तन मेळाव्यात जिजाऊ संघटना भिवंडी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर केले. जिजाऊ संघटना, आरपीआय सेक्युलर पक्ष व महाराष्ट्र दख्खन मुस्लिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बाळा कंपाऊंड येथील शाळेच्या मैदानावर परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस आर पी आय सेक्युलरचे चिटणीस अँड किरण चन्ने,महाराष्ट्र दख्खन मुस्लिम सेवा संघाचे इरफान शेख,कम्युनिस्ट नेते कोम्रेड विजय कांबळे यांसह मोठ्या संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते.

राजकारण हे सेवा कार्य करण्यासाठी असते,लोकप्रतिनिधींनी निस्वार्थ पणे  समाजाची सेवा करायला पाहिजे.परंतु सध्या राजकारणी हे स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी धडपडत असल्याने जिजाऊ संघटनेने लोकसभा निवडणूकच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखो सर्वधर्मीय नागरिकांना आज पर्यंत शैक्षणिक आरोग्य व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून नोकरी मिळवून देण्यात निस्वार्थपणे मदत केल्याने जनतेची मागणी म्हणून जिजाऊ संघटना लोकसभा निवडणुकी लढविण्याचा निर्णया घेतला आहे असे शेवटी निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Bhiwandi Lok Sabha Jijau organization to contest, show of power of Sambars in Parivartan Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.