भिवंडी मेट्रो, यंत्रमागाच्या पॅकेजला भाजपाचा फाटा?

By admin | Published: May 22, 2017 01:56 AM2017-05-22T01:56:24+5:302017-05-22T01:56:24+5:30

कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीपूर्वी विकास परिषद घेत दिलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या भाजपाने भिवंडीच्या

Bhiwandi Metro, BJP's package of power cuts? | भिवंडी मेट्रो, यंत्रमागाच्या पॅकेजला भाजपाचा फाटा?

भिवंडी मेट्रो, यंत्रमागाच्या पॅकेजला भाजपाचा फाटा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीपूर्वी विकास परिषद घेत दिलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या भाजपाने भिवंडीच्या निवडणुकीसाठी शनिवारी जाहीर केलेल्या घोषणापत्रात भिवंडी मेट्रो आणि यंत्रमांगांच्या पॅकेजला फाटा दिल्याचे दिसून आले. भाजपा ही आश्वासने देत असली, तरी ती तोंडी स्वरूपात आहेत. पक्षाने ती लेखी दिल्याचे टाळले आहे. यंत्रमांगांच्या अपग्रेडेशनसाठी कारखानदारांनीच प्रयत्न करायचे आहेत आणि ठाण्याची मेट्रो भिवंडीमार्गे कल्याणला नेण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली असली, तरी ती शहरातून जाणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेने मात्र आपल्या वचननाम्यात या दोन्ही आश्वासनांचा समावेश केला आहे.
या घोषणापत्रात पारदर्शक कारभाराची हमी देतानाच स्वच्छ भिवंडी- आरोग्यदायी भिवंडी, पुरेसे पाणी, रस्ते विकास, युवक विकास, शहराचा नियोजनबद्ध विकास आदींची हमी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला घर मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी विशेष निधी, शहरात सीसीटीव्हींचे जाळे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा गांधी रु ग्णालय, भिवंडी-ठाणे ग्रीन बस, मोफत वाय-फाय, अद्ययावत क्र ीडा संकूले, महापालिका शाळांचे पुनरूज्जीवन, मदरशांमध्ये आधुनिक सुविधा, महापालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन यांचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिवर्तन सभेत या घोषणापत्राचे प्रकाशन झाले.

स्वच्छ भिवंडी : प्रत्येक घरात स्वच्छतागृह, स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वयंसेवक, भूमिगत गटारे , कचरा उचलणाऱ्या गाडयांवर जीपीएस यंत्रणा व छोटी वाहने, कचऱ्यावर प्रक्रिया, महत्वाच्या भागात कचराकुंड्या.
नाल्यातील जलवाहिन्यांची दुरूस्ती : अमृत योजनेच्या २०६ कोटींच्या निधीतून पाणीवितरण पद्धतीत सुधारणा, नाल्यातून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची दुरु स्ती, टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात जलवाहिन्या, प्रत्येक सरकारी कार्यालयात पावसाळी पाणी साचविण्यासाठी यंत्रणा.
प्रत्येक चौकात सिग्नल, पार्किंग : वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्येक चौकात सिग्नल व पार्किंगची व्यवस्था. झेब्रा क्रॉसिंग व पदपथाची निर्मिती, एलईडी पथदिवे. केंद्र सरकारने ६० कोटी रूपये मंजूर केलेल्या अंजूरफाटा ते थेट वंजारपट्टी नाक्यापर्यंतच्या नव्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार.

आरोग्यदायी भिवंडी : प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य कार्ड तयार करून, त्याची वर्षातून एकदा मोफत शारीरिक तपासणी. टेली-मेडिसीनद्वारे सल्ला. इंदिरा गांधी स्मृती रु ग्णालयाला विशेष निधी देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार. ह्रदयविकार कक्ष, डायबेटीस सेंटर, आयसीयू, आयएनसीयू, डायग्नोसिस सेंटर, रेडियोलॉजी कक्ष सुरू करणार. रक्तपेढी स्थापणार. रूग्णवाहिकेसाठी हेल्पलाईन, मंडई-प्रभूआळी येथील बीजीपी दवाखान्याचे अद्यावत रु ग्णालयात रूपांतर करून आधुनिक सेवा देणार.
नियोजनबद्ध विकास : भिवंडी ते ठाणे ग्रीन बससेवा. शहरात सर्व ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा, मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरु स्ती, डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे आधुनिकीकरण, भाजीमार्केटचे योग्य जागी स्थलांतर, स्विमींग, बॅडमिंटन, टेनिससाठी क्रीडा संकूले, मुस्लिमांसाठी शादीखाना, कब्रस्तान, जैन साधूंसाठी विश्रामगृह, स्मशानघाटाचा पुनर्विकास आदी कामे करणार.पारदर्शक कारभार : पालिका प्रशासनाचा कारभार पारदर्शक करण्यात येऊन, सेवाधिकारासाठी विशेष कक्ष सुरू करणार. कोणतेही काम प्रलंबित न राहण्यासाठी झिरो पेंडन्सी पद्धत सुरू, तक्रारींसाठी केंद्र, पालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, महापालिकेचा जमाखर्च वेबसाईटवर जाहीर करणार. भाजपाचे घोषणापत्र वेबसाईटवर अपलोड करणार. त्यातून कामे पूर्ण झाली आहेत का, हे पाहता येणार.
महिला सुरक्षेला प्राधान्य : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असून, शहरात सीसीटीव्हींचे जाळे तयार करणार. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविणार. महिला व छोट्या मुलांच्या तपासणीसाठी हेल्थ सेंटर, उज्ज्वला योजनेतून गॅस पुरवठा, सॅनेटरी नॅपिकन व्हेंडिंग मशीन बसविणार.
युवकांचा विकास : महापालिका शाळांचे पुनरूज्जीवन करून शाळांत आधुनिक सुविधा, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे व करिअर मार्गदर्शन केंद्र, मदरशांमध्ये आधुनिक सुविधा, क्र ीडांगणाची निर्मिती, क्रीडांगणांवरील अनाधिकृत बांधकामे रोखणार.

Web Title: Bhiwandi Metro, BJP's package of power cuts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.