भिवंडी मनपाचा स्वच्छता विभाग सुस्त

By Admin | Published: July 13, 2015 03:17 AM2015-07-13T03:17:18+5:302015-07-13T03:17:18+5:30

शहराच्या लोकवस्तीतील दैनंदिन कचरा नियमित उचलला जात नाही, याबाबत वारंवार तक्रारी करूनही मनपाचा स्वच्छता विभाग सुस्त बनला असून

Bhiwandi Municipal cleanliness department slack | भिवंडी मनपाचा स्वच्छता विभाग सुस्त

भिवंडी मनपाचा स्वच्छता विभाग सुस्त

googlenewsNext

भिवंडी : शहराच्या लोकवस्तीतील दैनंदिन कचरा नियमित उचलला जात नाही, याबाबत वारंवार तक्रारी करूनही मनपाचा स्वच्छता विभाग सुस्त बनला असून कचरा ठेकेदार सुटीच्या दिवशी काम न करता मस्त बनले आहेत.
दैनंदिन कचरा नियमित न उचलल्याने वॉर्डावॉर्डांत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. मनपाने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी कचराकुंड्या उचलल्या. मात्र, घंटागाडी दारोदार फिरत नसल्याने कचरा रस्त्यावर जमा होऊ लागला. कचऱ्याने रस्ता व्यापल्यावर कचरा ठेकेदार तीन-चार दिवसांतून एकदाच कचरा उचलत असल्याने ऐन पावसाळ्यात पादचाऱ्यांना व रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचरा ठेकेदार हा कचरा जेसीबीने उचलून डम्परने वाहून नेत आहे. कामगारांचा वापर होत नसल्याने अर्धा कचरा त्याच जागेवर राहतो. तसेच तेथे जंतूनाशक फवारणी होत नसल्याने मच्छरांची पैदास होऊन रोगराई पसरत आहे.

Web Title: Bhiwandi Municipal cleanliness department slack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.