भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:30 AM2018-11-01T00:30:18+5:302018-11-01T00:30:36+5:30

नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो.

Bhiwandi Municipal Corporation's challenge of 330 crore recovery | भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

Next

भिवंडी : महापालिकेपुढे आर्थिक संकट असल्याची बतावणी करणाऱ्या अधिकाºयांसमोर सध्या शहरातील करदात्यांकडून ३३० कोटी रूपये वसूल करण्याचे आव्हान निर्माण झाले असून त्यासाठी पालिकेच्या पाच प्रभागांतून पाच पथके रवाना झाली आहेत.

महापालिका क्षेत्रात एकूण पाच प्रभाग समिती कार्यालये कार्यरत आहेत. नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो. ही बाब आयुक्त मनोहर हिरे व उपायुक्त वंदना गुळवे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वसुली विभाग अधिकारी व प्रभाग अधिकाºयांची बैठक घेऊन कानउघाडणी केली. तसेच १५ दिवसांत १५० कोटी वसुलीचे लक्ष्य ठरवून करवसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

२०१८-१९ या वर्षासाठी मागील थकबाकी धरून एकूण ३४४ कोटी ८४ लाख ९६ हजार ३४६ रुपये मालमत्ताधारकांकडून येणे असून त्यापैकी प्रभाग-१ मध्ये ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार ४८७ रुपये, तर प्रभाग-२ मध्ये ७३ कोटी ६४ लाख सात हजार ५१२ रुपये, प्रभाग-३ मध्ये ६२ कोटी ९२ लाख ६८ हजार ३०१ रुपये, प्रभाग-४ मध्ये ५५ लाख २७ हजार ४९ हजार ३३३ रुपये, प्रभाग-५ मध्ये ३८ कोटी १७ लाख ८८ हजार ७१३ रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी आॅक्टोबर महिन्यापर्यंत १४ कोटी २३ लाख ३३ हजार ५६७ रुपये वसुली पालिका अधिकाºयांनी केली आहे. उरलेली थकबाकी ३३० कोटी ६१ लाख ६२ हजार ७७९ रुपये आहे.

Web Title: Bhiwandi Municipal Corporation's challenge of 330 crore recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.