भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

By नितीन पंडित | Published: January 3, 2024 05:57 PM2024-01-03T17:57:09+5:302024-01-03T17:57:34+5:30

भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.

Bhiwandi municipality cleanliness drive stress on cleaning staff movement warning from action committee | भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

नितीन पंडित, भिवंडी:भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. या अतिरिक्त कामाचा ताण मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर पडला असून अनेक सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीने केला असून मनपा प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी केला नाही तर येत्या काही दिवसात मनपा प्रशासना विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील कृती समितीने लेखी निवेदनाद्वारे मनपा प्रशासनास दिला आहे.

शहरात विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे या स्वच्छता मोहिमेत सफाई कामगार काम करतात मात्र या सफाई मोहिमेत उड्डाणपुलाची सफाई रस्त्यांवरचे सफाई अशा विविध काम सफाई कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे विशेष म्हणजे शहर प्रत रोड कामगार असतानाही त्यांचा त्यांचे काम देखील सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मर्जीने हफ्तेखोरी करून घरी राहत आहेत तर अनेक सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने या सफाई कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण देऊ नये अन्यथा पालिका प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा असा इशारा कर्मचारी संघर्ष कृती समितीने दिला आहे.

Web Title: Bhiwandi municipality cleanliness drive stress on cleaning staff movement warning from action committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.