भिवंडी पालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे राजकारण्यांचे लक्ष
By नितीन पंडित | Updated: August 3, 2022 19:22 IST2022-08-03T19:21:17+5:302022-08-03T19:22:01+5:30
३४ प्रभागांमधून १०१ जागांसाठी होणार निवडणूक

भिवंडी पालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे राजकारण्यांचे लक्ष
नितिन पंडीत, लोकमत न्यूज नेटवर्क - भिवंडी: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३४ प्रभागांमधून १०१ जागांसाठी निवडणूक होणार असून प्रभाग प्रारूप आराखड्यास निवडणूक आयोगाने मंजुरी देऊन प्रकाशित केल्या नंतर पुढच्या टप्प्यात प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीर करण्यासाठी शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अंजुरफाटा येथील मानसी भरत गडा पदवी महाविद्यालयाच्या शांती चंदन सभागृहात आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे.
भिवंडी मनपात ३३ प्रभागात त्रीसदस्य तर एक प्रभागात द्विसदस्य असे एकूण ३४ प्रभाग असून त्यामधून १०१ सदस्य असणार आहेत त्यापैकी ५१ सदस्य या महिला असणार आहेत . ज्यात अनुसूचित जाती साठी ३ त्यापैकी २ महिलांसाठी ,तर अनुसूचित जमाती साठी १ जागा आरक्षित आहे . २७ जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या साठी राखीव असून त्यामध्ये १४ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७० जागा असून त्यामधील ३५ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत . या आरक्षण सोडती वर कोणतीही हरकत अथवा सूचना असल्यास ६ ते १२ ऑगष्ट दरम्यान त्या विहित वेळेत आयुक्त यांच्या अधिपत्या खालील निवडणूक कार्यालय अथवा प्रभाग समिती कार्यालयात नोंदवता येणार आहेत. विशेष म्हणजे या सोडतीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएम, शिवसेना, भाजपसह कोणार्क विकास आघाडीचे लक्ष लागले आहे.