भर पावसात भिवंडी मनपाच्या कचरा वाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण

By नितीन पंडित | Published: September 14, 2022 05:32 PM2022-09-14T17:32:06+5:302022-09-14T17:33:10+5:30

खासगी ठेकेदाराकडून कचऱ्याची वाहतूक उघड्या वाहनातून होत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Bhiwandi municipality's garbage carts carry garbage in heavy rains | भर पावसात भिवंडी मनपाच्या कचरा वाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण

भर पावसात भिवंडी मनपाच्या कचरा वाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण

Next

भिवंडी - भिवंडी महापालिकेत कचरा उचलण्यासाठी महापालिकेने खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. या खासगी ठेकेदाराकडून कचऱ्याची वाहतूक उघड्या वाहनातून होत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उघड्याने कचरा वाहून नेण्याची बाब भिवंडी शहरात नित्याचीच झाली आहे.

मागील काही दिवसांपासून भिवंडीत संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बुधवारी शहरातील रस्त्यांवरून भर पावसात उघड्यानेच कचऱ्याची वाहतूक सुरू होती. महापालिका अधिकाऱ्यांचे अथवा वाहतूक पोलीस प्रशासनाचे या उघड्या कचरा वाहू वाहनांकडे लक्ष जात नाही हेच दुर्दैवी आहे.
 

Web Title: Bhiwandi municipality's garbage carts carry garbage in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.