भिवंडी मनपाच्या कचरावाहू गाड्या उघड्यानेच वाहतात कचरा; दुर्गंधीने नागरिक हैराण
By नितीन पंडित | Published: August 21, 2023 06:08 PM2023-08-21T18:08:22+5:302023-08-21T18:08:44+5:30
ही बाब भिवंडी शहरात नित्याचीच झाली आहे.
भिवंडी: भिवंडी महापालिकेत कचरा उचलण्यासाठी महापालिकेने खाजगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.या खाजगी ठेकेदाराकडून कचऱ्याची वाहतूक उघड्या वाहनातून होत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उघड्याने कचरा वाहून नेण्याची बाब भिवंडी शहरात नित्याचीच झाली आहे.
मागील काही दिवसांपासून भिवंडीत अशा प्रकारे उघड्या गाड्यातून कचऱ्याची वाहतुकान्होत आहे.सोमवारी शहरातील अंजुरफाटा रस्त्यांवरून भर रस्त्यावरूनच उघड्यानेच कचऱ्याची वाहतूक सुरू होती.विशेष म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांचे अथवा वाहतूक पोलीस प्रशासनाचे या उघड्या कचरा वाहू वाहनांकडे लक्ष जात नाही हेच दुर्दैवी आहे.