Bhiwandi: भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीत हजारो शिवभक्त सहभागी
By नितीन पंडित | Updated: March 10, 2023 21:15 IST2023-03-10T21:14:42+5:302023-03-10T21:15:13+5:30
Bhiwandi News: छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती शुक्रवारी भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.

Bhiwandi: भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीत हजारो शिवभक्त सहभागी
- नितीन पंडित
भिवंडी - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती शुक्रवारी भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते. कामतघर,वाणी आळी,कासार आळी, ब्राह्माण आळी,खोणी या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
तर शिवजयंती निमित्त मुख्य मिरवणूक सायंकाळी सुरु झाली ज्यामध्ये असंख्य चित्ररथ,देखावे सहभागी झाले होते.सुरवातीला शिवाजी नगर येथून सुरु झाल्येल्या मिरवणुकीस माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी पुष्पहार अर्पण केल्या नांतर या भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ झालं. या शोभायात्रेत ढोलताशा,लेझीम पथकासह आदिवासी तराफा नृत्य,पारंपरिक खेळ सादर करीत होते .या मिरवणुकीत लोकप्रतिनिधी,व मोठ्या संख्यने शिवभक्त नागरिक ,महिला सहभागी झाल्या होत्या.
भिवंडी शहरात निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेत मुस्लिम धर्मीय युवकांचा सहभाग लक्षवेधी ठरला आहे .महाराष्ट्र व दख्खन मुस्लिम सेवा संघाचे प्रमुख इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली हे युवक कार्यकर्ते सहभागी झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, मावळे यांची नावे असलेला फलक हाती घेत घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.या मिरवणुकीत लहान मुलांनी बालशिवाजी महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा करत सहभाग नोंदविला.