Bhiwandi: भिवंडीत सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या; आरोपीस अटक

By नितीन पंडित | Published: July 26, 2024 09:08 PM2024-07-26T21:08:54+5:302024-07-26T21:09:11+5:30

Bhiwandi Crime News: घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता सदर प्रकरण मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली आहे.

Bhiwandi: Six-year-old boy murdered in Bhiwandi; Accused arrested | Bhiwandi: भिवंडीत सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या; आरोपीस अटक

Bhiwandi: भिवंडीत सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या; आरोपीस अटक

- नितीन पंडित
भिवंडी - घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता सदर प्रकरण मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर नारपोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात संभाजीनगर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

अमोल चव्हाण वय २२ असे अटक आरोपीचे नाव आहे.तर सुधीर विष्णू पवार वय ६ वर्ष असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. हायवे दिवे येथील ओमसाई राम बिल्डींग येथील सह वर्षाचा सुधीर यास २१ जुलै रोजी बुशुद्ध अवस्थेत कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्याचे नातेवाईक उपचारासाठी घेऊन गेले होते.वैद्यकीय तज्ञांनी सुधीर मयत असल्याचे सांगितल्याने त्याबाबत कळवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.परंतु शवविच्छेदनात सुधिरचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानंतर नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत,पोलिस निरीक्षक (गुन्हे ) प्रमोद कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे व त्यांच्या पथकातील हुडेकरी,जाधव, देसले, ताटे या पोलिस कर्मचाऱ्यांनी हत्ये बाबत कोणताही पुरावा नसताना शिताफीने तपास करताना हत्या झाल्यापासून तेथील अमोल चव्हाण यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या शोधा साठी पोलिस पथक संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे दाखल झाले.त्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीस ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

 जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण याने मयत सुधीर याची मोठी बहीण चंपा हिचेसोबत छेडछाड व मारहाण केली होती .ते सुधीर याने पाहिल्याने ही घटना आईवडिलांना सांगणार असे सांगितल्याने आरोपी अमोल चव्हाण याने सुधिर यांस त्याच इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून ठार मारले व त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनवा करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी अमोल चव्हाण यास हत्ये प्रकरणी दाखल गुन्ह्यात अवघ्या २४ तासात अटक केली आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Web Title: Bhiwandi: Six-year-old boy murdered in Bhiwandi; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.