भिवंडी एसटी स्थानक ते नागाव रस्ता अखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:24+5:302021-03-16T04:40:24+5:30
भिवंडी : गेल्या १५ वर्षांपासून शहरातील भिवंडी एसटी स्थानक ते नागाव गावठाणातील गायत्रीनगरपर्यंतच्या रस्त्याचे रखडलेले काम मनपा प्रशासनाने अखेर ...
भिवंडी : गेल्या १५ वर्षांपासून शहरातील भिवंडी एसटी स्थानक ते नागाव गावठाणातील गायत्रीनगरपर्यंतच्या रस्त्याचे रखडलेले काम मनपा प्रशासनाने अखेर पूर्ण केले आहे. याबद्दल भिवंडी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी सोमवारी नागरिकांच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
या रस्त्याचे काम मागील १५ वर्षांपासून रखडलेले होते. दोन किमी. लांबी व ६० फूट रुंदीचा रस्ता पालिका प्रशासनाने लवकरात लवकर तयार करावा व नागरिकांचा प्रवास सुखकर करावा, यासाठी स्थानिक राजकीय पुढारी व नागरिक सतत प्रयत्नशील होते. एमएमआरडीएच्या अर्थसाहाय्यातून सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून मनपा प्रशासनाने या रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवास सुखमय केल्याने प्रवाशांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.