भिवंडी एस टी कामगारांचा वाद पोलीस ठाण्यात, स्थानकाबाहेर पोलीस बंदोवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:21 PM2018-06-08T14:21:58+5:302018-06-08T14:21:58+5:30
भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेला.याची नोंद घेत पोलीसांनी स्थानकांमध्ये कडक पोलीस बंदोवस्त लावला आहे.
एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी,जोपर्यंत कामगार, कर्मचाºयांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी,अशा विविध मागण्यासाठी कामगार संघटनांनी शहरातील भिवंडी आगारात आज पहाटेपासून संपाला सुरूवात झाली. राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेली वेतनवाढ करार हा फसवा असल्याची माहिती एस.टी कामगारांनी दिली.त्यामुळे हा संप अघोषित असल्याने भिवंडी एस.टी.आगारातील कर्मचा-यांमध्ये संपाबद्दल संभ्रम निर्माण झाला त्यामुळे दोन कामगार संघटनेच्या सदस्यांचा वाद झाला. भिवंडी आगारात एकूण पाच कामगार संघटना असून महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना व महाराष्ट्र एस.टी. वर्कस् काँग्रेस(इंटक)या संपामध्ये सहभागी होत्या तर शिवसेना,कास्टट्राईब व मनसे या तीन संघटनांनी या संपाला विरोध दर्शविला होता. ४५४ पैकी केवळ ६३ कर्मचारी कामावर हजर असल्याने आजचा संप यशस्वी ठरल्याची माहिती कर्मचाºयांनी दिली. प्रवास्यांचे हाल होऊ नये म्हणून आगार प्रमुख एस.पी.डूंबरे यांनी पोलीस बंदोवस्तात कल्याण,ठाणे,वाडा या ठिकाणी बसेस सोडल्या. तसेच बाहेरून आलेल्या बसेस देखील आगारात येऊन जात होत्या.मात्र कोणताही अनुचीत प्रकार घडली नाही.
दरम्यान भिवंडी आगारातील महाराष्ट्र कामगार संघटनेचा सदस्य जी.बी.इंगळे व व्हि.जी.आव्हाड यांच्यामध्ये बसेस आगाराबाहेर काढण्यावरून शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने इंगळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीसांनी या बाबत नोंद घेऊन दोघांनाही समज दिली.याच वेळी भिवंडी आगारात बसेस उभ्या असताना शिवसेना प्रणीत संघटनेच्या पदाधिकाºयांनी संप अयशस्वी जाल्याचा दावा केला.या संपाचा फायदा घेत शहरातील काही रिक्षाचालकांनी ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी प्रवाश्यांची वाढीव भाडे मागून लूट केली. त्यामुळे प्रवाश्यांनी तिव्र संताप व्यक्त केला.