अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

By अजित मांडके | Published: June 26, 2024 04:48 PM2024-06-26T16:48:42+5:302024-06-26T16:50:17+5:30

बार्जवरील कामगार पथकाला कारवाईची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार

Bhiwandi tehsil office action on illegal sand extraction barge | अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अवैध वाळू उपसाविरोधात बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात कारवाई करून १ बार्ज, १ सक्शन जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईतील मुद्देमालाची अंदाजे किंमत २४ लाख असून, यासंबंधी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निदेर्शानुसार सकाळी ९ वा काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात खारबाव मंडळ अधिकारी व भिवंडी मंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त तलाठी यांच्या मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये १ बार्ज, १ संक्शन आढळून आले.

बार्जवरील कामगार पथकाची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार झाले. पळून जाण्यापूर्वी बार्ज वॉल काढण्यात आल्याने व बोटीच्या सहाय्याने ओढून आणणे शक्य नसल्याने तेथेच पाण्यात बुडवण्यात आला. १ सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर आणून खाडी किनारी काढून पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कट करुन नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.

Web Title: Bhiwandi tehsil office action on illegal sand extraction barge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.