भिवंडीत तहसीलदारांची अनधिकृत रेती माफियांवर कारवाई; ३० लाखांचे बार्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:45 PM2022-04-04T19:45:35+5:302022-04-04T19:45:47+5:30

तहसीलदार अधिक पाटील यांच्या कारवाई मुळे रेती माफियां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Bhiwandi Tehsildar cracks down on unauthorized sand mafias; 30 lakh barge seized | भिवंडीत तहसीलदारांची अनधिकृत रेती माफियांवर कारवाई; ३० लाखांचे बार्ज जप्त

भिवंडीत तहसीलदारांची अनधिकृत रेती माफियांवर कारवाई; ३० लाखांचे बार्ज जप्त

Next

भिवंडीठाणे जिल्ह्यातील अनधिकृत रेती उत्खननावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्यानंतर कल्याण ठाणेभिवंडी भागातील रेती माफियांवर महसूल विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या आदेशाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने पिंपळास ते कोनगाव खाडी किनारी कारवाई करीत ३० लाख रुपयांचे तीन बार्ज सोमवारी जप्त केले आहेत.

पिंपळास ते कोन या खाडी किनारी खारबाव मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर, भिवंडी अप्पर मंडळ अधिकारी अतुल नाईक व मंडळातील कोन, वेहेळे, अंजुर, पूर्ण तलाठी या पथकाने कोनगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे समवेत सकाळी बोटीच्या सहाय्याने खाडीमध्ये अनाधिकृत रित्या रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंप व बार्ज वर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असता गोवा-पिंपळास या खाडी पात्रात ३ बार्ज आढळून आले.

कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील व्यक्तींनी पलायन केले .त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने खाजगी हायड्रो च्या साह्याने ३० लाख किमतीचे तिन्ही बार्ज खाडी किनारी शेतात काढून सील करीत स्थानिक पोलीस पाटील यांचे ताब्यात देण्यात आले आहेत. कोनगाव पोलीस ठाण्यात बार्ज मालक  व कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अधिक पाटील यांच्या कारवाई मुळे  रेती माफियां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे .

Web Title: Bhiwandi Tehsildar cracks down on unauthorized sand mafias; 30 lakh barge seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.