भिवंडीतील टोलनाके बनले दादागिरीचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:55 PM2020-02-16T23:55:07+5:302020-02-16T23:55:14+5:30

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर

Bhiwandi Tolnak became the base of Dadadgiri | भिवंडीतील टोलनाके बनले दादागिरीचे अड्डे

भिवंडीतील टोलनाके बनले दादागिरीचे अड्डे

Next

नितीन पंडित, भिवंडी

वंडी शहर व ग्रामीण भागात व्यापार, व्यवसाय व गोदामपट्टा विकसित झाला असल्याने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. याच बाबींचा विचार करून इतर शहरांतून तसेच राज्यातून भिवंडीत दाखल होणाऱ्या सर्वच मार्गावर शासनाने टोलनाके बसवले आहेत. एकट्या भिवंडी तालुक्याचा विचार केला तर पाच टोलनाके भिवंडीत आहेत. मात्र, येथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या टोलनाक्यांवर टोलवसुली मात्र जोरात नव्हे तर सक्तीने सुरू असते, त्यामुळे भिवंडीतील हे टोलनाके दादागिरीचे अड्डे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर कोन-गोवा टोलनाका, भिवंडी-वसई मार्गावर मालोडी टोलनाका, भिवंडी-ठाणे मार्गावर कशेळी टोलनाका तसेच भिवंडी-वाडा महामार्गावर कवाड येथे टोलनाका आहे. सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाºया अपघातांमुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर कवाड टोलनाका बंद आहे. मात्र, इतर चारही टोलनाके दिवसरात्र सुरूच आहेत. या टोलनाक्यांवरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जाते. ही टोलवसुली रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आहे की वैयक्तिक फायद्यासाठी, याची जाणीव बहुधा टोलनाक्यावरील टोलवसुली करणाºया कर्मचाऱ्यांना नसावी. त्यामुळे त्यांच्याकडून टोलवसुली सक्तीने केली जात आहे. त्यामुळे या टोल कर्मचाºयांना शिष्टाचाराची शिकवण देण्याची गरज आहे. कारण, या टोल कर्मचाºयांकडून अनेक वेळा सक्तीने टोलवसुली करताना वादविवाद झाल्याच्या अनेक घटना येथील सर्वच टोलनाक्यांवर घडत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर वाहतूककोंडी झाली असताना या वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी या रुग्णवाहिकेला रस्ता करून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांनी केली असता मुजोर टोल कर्मचाºयांनी धक्काबुक्की केली. निंबाळकर हे शनिवारी आपल्या कुटुंबासह शिर्डीसाठी निघाले होते. त्यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेने टोल कर्मचाºयांच्या मुजोरीचे दर्शन सर्वांना घडले. विशेष म्हणजे पडघा टोलनाक्यावर वाहनचालकांशी टोल कर्मचाºयांच्या धक्काबुक्कीची घटना ही काही नवी नाही. यापूर्वी याच टोलनाक्यावर टोलवसुलीवरून थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. टोलकंपनीचे मालक मुद्दाम आपल्या टोलनाक्यांवर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना टोलवसुलीसाठी ठेवतात, असा आरोप आहे. एखाद्या वाहनचालकाने काही कारणास्तव टोल देण्यास असमर्थता दर्शविली की, हे टोल कर्मचारी थेट मारहाणच करतात. याची प्रचीती या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या सर्वच प्रवाशांना आल्याशिवाय राहणार नाही. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जर हे टोल कर्मचारी धक्काबुक्कीचे वर्तन करीत असतील, तर सामान्य वाहनचालकांचे काय, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे वाहनचालकांशी मुजोरीने वागणाºया व दादागिरीने टोल वसूल करणाºया मुजोर टोल कर्मचाºयांवर पोलिसांतर्फे कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, जेणेकरून या दादागिरीला कुठेतरी आवर घातला जाईल. टोलनाक्यावर टोलवसुलीचे काम करणे म्हणजे आपल्या खासगी मालमतेची वसुली करीत आहोत, असे नसून आपण या टोलनाक्यावर पगारावर काम करणारे नोकर आहोत, मारहाण करणारे ‘दादा’ नाहीत, याची जाण टोलवसुलीचे काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयांनी ठेवणे गरजेचे आहे. किंबहुना, तशी जाण पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाºयांनी करून देणे गरजेचे आहे. अन्यथा, सक्तीच्या टोलवसुलीदरम्यान झालेल्या वादातून एखाद्याला आपल्या जीवाला गमवावा लागेल. त्यामुळे टोलनाक्यांवरील दादागिरी वेळीच थांबविणे काळाची गरज आहे.

भिवंडी हा व्यापारी भाग असून गोदामपट्टा आहे. त्यामुळे या परिसरात पाच टोलनाके येतात. या टोलनाक्यांवरील कर्मचाºयांच्या दादागिरीचा अनुभव सर्वसामान्यांना अनेकदा येतो. टोलनाके कंत्राटदारांकडून रस्त्याची देखभाल फारशी होत नसल्याने अनेकदा टोल देण्यास लोक विरोध करतात. नेमकी हीच संधी साधून त्यांना दमदाटी केली जाते व वेळप्रसंगी मारहाण केली जाते.

Web Title: Bhiwandi Tolnak became the base of Dadadgiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.