भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:04+5:302021-09-14T04:47:04+5:30

पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावर खड्डे पडतात. सर्वच पक्षातील नेते रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसतात. विशेष म्हणजे ज्या ...

In Bhiwandi, the traffic police filled the potholes on the road | भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

Next

पावसाळा सुरू होताच शहरातील महामार्गावर खड्डे पडतात. सर्वच पक्षातील नेते रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा अधिकारी खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र त्यानंतर रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांना या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने वाहतूक पोलिसांनीच भिवंडी शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.

भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याबाबत पत्र दिले होते. मात्र त्याकडे सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई नाशिक महामार्ग, तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसानदेखील होत असून, नागरिक यासाठी वाहतूक पोलिसांना जबाबदार ठरवतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मनसैनिकांनी खड्ड्यांच्या मुद्यावर मालोडी टोलनाका फोडला होता. पडघा व कशेळी टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खड्ड्यांचा अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. याशिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गांवरून काढण्यात आली. त्यावेळी तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे.

Web Title: In Bhiwandi, the traffic police filled the potholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.