भिवंडीत गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जाळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 05:46 PM2020-09-12T17:46:11+5:302020-09-12T17:46:42+5:30
सुदैव म्हणजे या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भिवंडी - तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन या गोदाम संकुलातील गोदामांना शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे . इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील इमारत क्रमांक 229 मधील गोदाम क्रमांक 7 येथे असलेल्या पेपर अँड बोर्ड इंप्लाय या गोदामात आग लागून नजीकच्या कॉर्डस्ट्रिप्स ,शुअर या गोदामात पाहता पाहता ही आग पसरत या आगीत तब्बल 5 गोदामांमध्ये साठवून ठेवलेले प्लास्टिक साहित्य ,रंगीत कागदी पॅकिंग यंत्र व कच्चा माल व नजीकच्या गोदमतील फरसाण बनविण्याच्या कारखान्यात ही आग पसरून येथील सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे .
घटनेची माहिती कळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी खाजगी टँकर च्या मदतीने ही आग दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली असून आग अजूनही धुमसत असून ही आग एवढी भयानक होती की या सर्व गोदामांचे पत्र्याचे छत लोखंडी अंगलसह कोसळले होते, सुदैव म्हणजे या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या