दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट

By सदानंद नाईक | Published: September 23, 2024 06:09 PM2024-09-23T18:09:13+5:302024-09-23T18:09:40+5:30

आमदार कुमार आयलानी यांनी रविवारी घाटाची पाहणी करून कामाला सुरुवात होण्याचे संकेत दिले

Bhoomi Pujan was held in Ulhasnagar a year and a half ago; The work of Ulhas river ghat is incomplete | दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट

दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट

सदानंद नाईक, उल्हासनगर: अंटेलिया-रिजेन्सी येथील उल्हास नदी घाटाच्या कामाचे भूमिपूजन दिड वर्षांपूर्वी होऊनही काम अर्धवट स्थितीत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी रविवारी घाटाची पाहणी करून कामाला सुरुवात होण्याचे संकेत दिले.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारी अंटेलिया-रिजेन्सी येथे घाट बांधण्याची संकल्पना आमदार कुमार आयलानी यांची आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दिड वर्षांपूर्वी कामाचे भूमिपूजन केले. आमदार व शासनाच्या निधीतून घाट कामाला सुरुवात केली. मात्र दिड वर्षात एका भिंतीच्या पुढे काम झाले नसल्याची टीका होत आहे. महापालिका बांधकाम विभागाने शासनाच्या नागरी सुविधा निधी व आमदार निधी अशा एकून १ कोटी ३५ लाख रुपये घाटाच्या कामासाठी मंजूर असल्याची माहिती दिली. मात्र काम संथगतीने सुरू असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. घाटासाठी शासनाकडे १० कोटींची मागणी केल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली आहे.

उल्हास नदी किनारी घाट बांधून त्याठिकाणी नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बेंचेस, स्वच्छतागृह, नदी घाट ठिकाणी वॉचमन रूम, पूजेसाठी सुविधा बांधण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार आयलानी यांनी दिली. प्रत्यक्षात काम संथगतीने सुरू असल्याने, घाटाचे काम कधी होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Web Title: Bhoomi Pujan was held in Ulhasnagar a year and a half ago; The work of Ulhas river ghat is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.