महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 3, 2024 04:35 PM2024-01-03T16:35:52+5:302024-01-03T16:36:31+5:30

तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले.

Bhoomipujan of Mahatma Phule Vichar Prabodhan Katta completed | महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

ठाणे : आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कट्टयामुळे अठरा पगड जातीसमुहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले.

यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावनाही व्यक्त केली. यावेळी प्रफुल वाघोले यांनी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केली. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधु-भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणीत केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे, अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी, यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचे भूमिपुजन डावखरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना पक्ष प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, विकास दाभाडे, समता विचार प्रसारक मंडळाचे अजय भोसले व इतर उपस्थित होते.

Web Title: Bhoomipujan of Mahatma Phule Vichar Prabodhan Katta completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे