भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
By नितीन पंडित | Published: April 28, 2023 06:18 PM2023-04-28T18:18:41+5:302023-04-28T18:20:10+5:30
या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
भिवंडी - महानगरपालिका क्षेत्रातील पद्मानगर विभागातील विविध रस्त्यांसाठी स्थानिक नगरसेवक व माजी सभागृह नेते सुमित पाटील यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने एम एम आर डी एच्या माध्यमातून या रस्त्यांसाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी आमदार महेश चौघुले, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी,स्थानिक नगरसेवक सुमित पाटील,आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भिवंडी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे याकडे स्थानिक जनतेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण व्यक्तिशः कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले.
या ३६ कोटी रुपयांच्या निधी मधून भिवंडी शहरातील पद्मानगर येथील राम मंदिर ते विजयश्री हॉटेल, हाथी सायझिंग ते राम मंदिर तर गणेश टॉकीज ते राम मंदिर या तीन रस्त्यां सह शांतीनगर विभागातील सागर प्लाझा हॉटेल ते शांतीनगर मुख्य रस्ता व खंडूपाडा ते दारुलफाला मस्जिद या पाच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.