भिवंडीतील ओवळी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन; लाखो प्रवाशांची सोय होणार

By नितीन पंडित | Published: September 15, 2023 07:32 PM2023-09-15T19:32:42+5:302023-09-15T19:33:28+5:30

अखेर आज आज या उड्डाणपुलाचे भूमीपूजन करण्यात आले अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

Bhumi Poojan of Ovali Railway Flyover in Bhiwandi | भिवंडीतील ओवळी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन; लाखो प्रवाशांची सोय होणार

भिवंडीतील ओवळी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन; लाखो प्रवाशांची सोय होणार

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी: दिवा-वसई रोड रेल्वेमार्गावरील ओवळी-कामतघर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या पुलामुळे रेल्वे फाटकात दररोज होणारा १५ ते २० मिनिटांचा नागरिकांचा खोळंबा टळणार आहे.या उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, येत्या मार्चपर्यंत पूलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.           

देशभरातील २२०० हून अधिक रेल्वे गेटच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत असून त्यानुसार ओवळी येथे रेल्वेमार्गावरील पुलाला मंजुरी मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला होता. अखेर आज आज या उड्डाणपुलाचे भूमीपूजन करण्यात आले अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. या पुलासाठी ६० कोटींचा निधी मंजूर झाला असून केंद्र व राज्य सरकारकडून पुलासाठी प्रत्येकी ५० टक्के निधी दिला जाणार आहे. येत्या मार्चपर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बहुमजली विभागाकडून पुलाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पुलामुळे ओवळी-कामतघर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, माजी नगरसेवक निलेश चौधरी, ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना यतीश म्हात्रे, माजी सरपंच मनीष पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Bhumi Poojan of Ovali Railway Flyover in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.