मोखाड्यातील बिवलपाडा पारतंत्र्यातच

By admin | Published: December 28, 2015 02:00 AM2015-12-28T02:00:55+5:302015-12-28T02:00:55+5:30

मोखाडापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील बिवलपाड्यात आरोग्य, वीज, रस्ता आणि शिक्षण या मुलभूत अद्याप पोचलेल्या नाहीत.

Bichalpa Parivartya in the Mokhada | मोखाड्यातील बिवलपाडा पारतंत्र्यातच

मोखाड्यातील बिवलपाडा पारतंत्र्यातच

Next

वसई : मोखाडापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील बिवलपाड्यात आरोग्य, वीज, रस्ता आणि शिक्षण या मुलभूत अद्याप पोचलेल्या नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही येथील गावकरी हालाखीचे जिणे जगत आहेत. डोंगरदऱ्यांच्या कुशीत अति दुर्गम भागात बिवलपाडा वसला आहे. ३५ घरे आणि २०० च्या आसपास लोकवस्ती असलेला बिवलपाडा अद्यापही नागरी सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे.
दोन्ही बाजूने नदीचे पाणी आणि दुसऱ्या दोन बाजूला उंचच उंच डोंगर रांगा. एखादा रुग्ण अत्यवस्थ झाल्यास गावकरी चादरीची डोली बांधून खांद्यावर १० किलोमीटरची पायपीट करीत आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात. रात्री-अपरात्री तर रुग्णाला नेणे फारच जिकीरीचे होऊन बसते. बिवलपाड्यापासून ६ किलोमीटर अंतरापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यानंतर गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. तीन वर्षांपूर्वी एमआरजीएस योजनेतून मातीचा भराव करून कच्चा रस्ता बनवला होता. पण, पावसाळ्यात तो वाहून गेल्याने गावकऱ्यांना जंगलातील पायवाटेने पायपीट करावी लागत आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून ३० ते ३५ विद्यार्थी आहेत. सध्या शाळेत चारच शिक्षक आहेत. ते नियमितपणे येत नसल्याने शाळा आठवड्यातून जेमतेम चार दिवस भरते. इतर दिवशी शिक्षक त्यांच्या वेळेनुसार शाळेत येत असल्याने शाळेला टाईमटेबलच नाही. शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी वर्गखोलीचे सुुरु केलेले काम अपूर्णावस्थेत आहे. शाळेत एकंदर शैक्षणिक वातावरणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होणार हा खरा प्रश्न आहे. गावातली अंगणवाडीे एखाद्या घराच्या अंगणात अथवा झाडाखाली भरते, ती ही आठवड्यात तीन चार दिवसच. पावसाळ्यात तर ती भरतच नाही. शालेय आणि अंगणवाडी पोषण आहार धायोडीहून ६ किलोमीटरची पायपीट करीत डोक्यावरून आणावा लागतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी नियमित पोषण आहारापासूनही वंचित राहतात. अंगणवाडी इमारतीचे काम अद्याप अर्धवट आहे.

Web Title: Bichalpa Parivartya in the Mokhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.