भिवंडीत राजकीय बंड

By admin | Published: May 5, 2017 06:03 AM2017-05-05T06:03:24+5:302017-05-05T06:03:24+5:30

अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने आणि राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटण्यास तयार नसल्याने सर्व पक्षांतील उमेदवारांतील

Bifurcate political rebellion | भिवंडीत राजकीय बंड

भिवंडीत राजकीय बंड

Next

भिवंडी : अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने आणि राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटण्यास तयार नसल्याने सर्व पक्षांतील उमेदवारांतील अस्वस्थता वाढली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्यास वेळ लागत असल्याने घालमेल सुरू झाल्याने असंतोष उफाळल्याने भिवंडीत विविध पक्षात बंडाचे निशाण फडकावले गेले आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत अनेक नाराज अर्ज भरतील, अशी स्थिती आहे.
भाजपा, शिवसेना, मनसे, कोणार्क आघाडी हे वेगळे लढत असताना आता काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षही वेगळे लढणार असल्याने भिवंडीच्या लढती बहुरंगी होतील, असे गुरूवारी स्पष्ट झाले.
वेगवेगळ््या पक्षातील उमेदवार फुटावेत यासाठी तुमचा निवडणुकीचा खर्च आम्ही उचलतो असे आमिष दाखवण्यासही सुरूवात झाली आहे. त्यामुले कुंपाणावर असलेले अनेक उमेदवार किती खर्च करणार, असा थेट प्रश्न विचारू लागले आहेत. काही ठिकाणी तर रकमा वाढत गेल्याने उमेदवार रोज वेगळ््या पक्षाचे नाव घेताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)

आरोपी प्रशांत म्हात्रे निवडणूक लढवणार
भिवंडी : महानगरपालिकेचे सभागृह नेता मनोज म्हात्रे यांच्या खून प्रकरणातील कथित आरोपी प्रशांत म्हात्रे येत्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलयक वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी उमेदवारीवरून झालेल्या वादातून मनोज म्हात्रे यांचा खून झाला होता. त्यामधील आरोपी प्रशांत हा सध्या कैदेत असून तो प्रभाग समिती क्र.२० क आणि ड या दोन वॉर्डातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर विकास पाटील हे भाजपामधून अर्ज दाखल करणार आहेत, तर उमेश भोईर हे काँग्रेसतर्फे रिंगणात उतरणार आहेत.

नऊ उमेदवारांचे अर्ज
भिवंडी : पालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाच्या नऊ उमेदवारांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. सुहास जालिंदर नकाते यांनी भाजपातर्फे व अपक्ष म्हणून, निशा प्रदीप बोडके, सुशिला प्रभाकर काठवळे यांनी अपक्ष म्हणून, नेहा नवीन काठवळे, संतोष जानू चव्हाण यांनी अपक्ष म्हणून, काँग्रेस पक्षाचे अन्सारी मोहम्मद वसीम मो. हुसेन, शेख नसीम अशफाक यांनी एमआयएमतर्फे उमेदवारी अर्ज भरले.

Web Title: Bifurcate political rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.