मोठा अपघात टळला! दिवा ठाणे मार्गावर मालागडीचे कपलिंग तुटल्याने डब्बे झाले विलग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 18:45 IST2021-08-25T18:20:35+5:302021-08-25T18:45:18+5:30
Accident :सुदैवाने मोठा अपघात टळला आणि अर्ध्या तासात डबे जोडून गाडी पुन्हा मुंबईला रवाना झाली.

मोठा अपघात टळला! दिवा ठाणे मार्गावर मालागडीचे कपलिंग तुटल्याने डब्बे झाले विलग
अनिकेत घमंडी
डोंबिवली: दिवा ठाणे मार्गावर एका मालागडीचे कपलिंग तुटल्याने डबे वेगवेगळे झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता घडली. सुदैवाने मोठा अपघात टळला आणि अर्ध्या तासात डबे जोडून गाडी पुन्हा मुंबईला रवाना झाली.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्याचे वास्तव असून त्या मालगाडीचा 9 वा दहावा डबा कपलिंग तुटल्याने वेगळा झाला. काही क्षणात याबाबत पायलटला माहिती मिळाली. त्यानुसार गाडी कंट्रोल करून त्यांनी थांबवली, पाठोपाठ कपलिंग तुटल्याने वेगवेगळे झालेले डबे देखील स्थिरावले, पण या घटनेमुळे जलद मार्ग विस्कळीत झाला. त्या घटनेनंतर मागे चार लोकल अडकल्या होत्या, परंतु पाच वाजल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. त्यानंतर हळुहळु लोकल सेवा पूर्ववत झाली.
कराड हादरलं! दोन मुलांचा खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्नhttps://t.co/Oe4VWJeftg
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021