नऊ जागांवर आपसांत नगरसेवकांचीच बिग फाइट

By admin | Published: February 16, 2017 01:53 AM2017-02-16T01:53:10+5:302017-02-16T01:53:10+5:30

युती तुटल्याने आणि आयारामांच्या गोंधळामुळे परस्परांचे मित्र असलेले विद्यमान नगरसेवक आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Big fight among corporators in nine seats | नऊ जागांवर आपसांत नगरसेवकांचीच बिग फाइट

नऊ जागांवर आपसांत नगरसेवकांचीच बिग फाइट

Next

ठाणे : युती तुटल्याने आणि आयारामांच्या गोंधळामुळे परस्परांचे मित्र असलेले विद्यमान नगरसेवक आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात शत्रुपक्षावर तुटून पडण्याकरिता ते सिद्ध झाले आहेत. त्यानुसार, १३१ जागांपैकी ९ जागांवर आता विद्यमान नगरसेवक एकमेकांना भिडणार आहेत. यामध्ये नौपाडा, मुंब्रा आदी भागांत दोघा नगरसेवकांमध्ये बिग फाइट पाहावयास मिळणार आहे.
२१ फेब्रुवारीला ठाणे महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. यात जनताजनार्दन कोणावर कृपादृष्टी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या वतीने येथे अ मधून माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक हरिश्चंद्र पाटील हे रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपाचे विद्यमान नगरसेवक मुकेश मोकाशी आहेत. पाटील यांची ही सलग तिसरी टर्म असून मोकाशी यांची ही दुसरी टर्म असल्याने या बिग फाइटमध्ये कोण चौकार मारणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशीच लढत प्रभाग क्रमांक ५ ड मध्ये होत असून या ठिकाणी सुधाकर चव्हाण हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते अपक्ष असून त्यांना टक्कर देण्यासाठी सेनेच्या विद्यमान नगरसेविका परिषा सरनाईक मैदानात आहेत. तिसरी लढत ही रिपाइंच्या एकतावादी गटाच्या नगरसेविका रेखाबाई इंदिसे यांची आणि राष्ट्रवादीच्या राधाबाई जाधवर यांच्यात होणार आहे. ही लढत प्रभाग क्रमांक ६ क मध्ये होत आहे. तर, याच प्रभागातील ड मध्ये स्वीकृत नगरसेवक नागसेन इंदिसे यांची लढत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्याशी होणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ ड मध्ये सेनेच्या विद्यमान नगरसेविका अनिता बिर्जे यांची लढत भाजपाचे मिलिंद पाटणकर यांच्याशी होणार आहे. प्रभाग क्रमांक १७ ड मध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक तथा रिपाइं (आठवले गटाचे शहराध्यक्ष) रामभाऊ तायडे यांची लढत शिवसेनेचे योगेश जाणकर यांच्याशी होत आहे. सहावी लढत ही प्रभाग क्र. २० ड मध्ये पाहावयास मिळणार असून येथे जायंट किलर म्हणून सुपरिचित भाजपाचे भरत चव्हाण यांची लढत सेनेचे गिरीश राजे यांच्याशी होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Big fight among corporators in nine seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.