Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:50 AM2021-09-15T09:50:25+5:302021-09-15T09:53:16+5:30

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरी करताना लागली आग

A big fire broke out in the oil stolen transformer and the thieves started firing in ambernath MIDC | Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली

Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली

googlenewsNext
ठळक मुद्देआगीसोबतच ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्फोटसुद्धा झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग पूर्णपणे विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागल्याची घटना घडली. एमआयडीसी अग्निशमन दलानं काही वेळातच ही आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरात क्रेमॉइंट नावाची कंपनी असून या कंपनीच्या बाजूला विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला रात्री ११.३० सुमारास अचानक मोठी आग लागली. 

आगीसोबतच ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्फोटसुद्धा झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग पूर्णपणे विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आग विझवल्यानंतर ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता, ही आग ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल चोरताना लागल्याची धक्कादायक बाब समोर आली. ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकचे पाईप बसवण्यात आले होते. तसेच ट्रान्सफॉर्मरपासून काही अंतरापर्यंत काही प्लास्टिकचे पाईप टाकून त्याद्वारे ही चोरी केली जात असल्याचं समोर आलं. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी ऑईल चोरी करणारे चोरटे ट्रान्सफॉर्मर जवळच उभे होते. मात्र, आग लागताच चोरट्यांनी धूम ठोकली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: A big fire broke out in the oil stolen transformer and the thieves started firing in ambernath MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.