मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी, लाखो रुपयांची केली मागणी
By रणजीत इंगळे | Published: April 22, 2024 02:10 PM2024-04-22T14:10:58+5:302024-04-22T14:16:51+5:30
Jitendra Awhad : आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली असून अन्यथा सलमान खान सारखं प्रकरण करण्याची धमकी दिली आहे. रोहित गोदारा नामक व्यक्तीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. ओस्ट्रेलिया वरून फोन केला असल्याचे फोन वरील व्यक्तीनी सांगितले.
अभिनेता सलमान खानच्या बंगल्या बाहेर गोळीबार
बंग अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) नुकताच जीवघेणा प्रसंग ओढावला. त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर परवा पहाटे दोन गुंडांनी गोळीबार केला. पहाटे 4 वाजता दोन गुंड दुचाकीवर आले आणि त्यांनी ४ गोळ्या झाडल्या. ही सलमान खानला दिलेली चेतावनी होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली.
काहीही झालं तरी काम सुरु ठेवणार
गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानने आपल्या टीमला एकच सांगितलं की काहीही झालं तरी कामावर परिणाम होणार नाही. सर्व शूट वेळेतच पार पडतील. त्यात बदल करु नका. धमक्या आधीही आल्या आहेत पण तेव्हाही काम सुरुच होतं आणि आताही राहील.