माजीवडा येथील रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:16+5:302021-07-05T04:25:16+5:30

ठाणे : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत लोकमत आणि रोटरी क्लब ...

Big response to blood donation camp at Majivada | माजीवडा येथील रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

माजीवडा येथील रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

Next

ठाणे : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत लोकमत आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पेरियल, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्स आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी माजीवडा येथील सत्यम फोर्ड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यता आले होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पेरियलच्या अध्यक्षा निहारिका देसाई, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या अध्यक्ष नीलम केळकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे रॉयल्सचे अध्यक्ष उमेश पटेल आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाउनचे अध्यक्ष दीपक पांडे व इतर रोटेरियन्स उपस्थित होते. तिसा ब्लड बँकेने या शिबिराला सहकार्य केले. या शिबिरात रोटेरीयन्स, रोटरॅक्टर्स यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून शिबिरात आपला सहभाग नोंदविला. तसेच ओ निगेटिव्ह रक्तगटानेदेखील रक्तदान केले.

--------------

Web Title: Big response to blood donation camp at Majivada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.