उल्हासनगरात चेटीचंड यात्रेनिमित्त बाईक रॅली
By सदानंद नाईक | Published: April 9, 2024 04:05 PM2024-04-09T16:05:47+5:302024-04-09T16:06:24+5:30
शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
सदानंद नाईक, उल्हासनगर : चेटीचंडपूर्वी रिजेन्सी-अंटेलिया ते कैलास कॉलनी दरम्यान मंगळवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष भारत गंगोत्री, ठाकरेसेनेचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजाचे दैवत साई झुलेलाल यांच्या अवतरण दिवसा निमित्त चेटीचंड महायात्रा काढण्यात येते. महायात्रेपूर्वी मंगळवारी रिजेन्सी-अंटेलिया ते कैलास कॉलनी दरम्यान बाईक रॅली काढण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, ठाकरेसेनेचे धनंजय बोडारे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर पश्चिमेतील झुलेलाल मंदिर ते स्वामी शांतीप्रकाश आश्रम दरम्यान १० एप्रिल रोजी महायात्रा काढण्यात येणार आहे.
शहरातून निघणाऱ्या चेटीचंड यात्रे निमित्त चौक, मार्केट, रस्ते रोषणाईने उजळले आहे. यात्रेचे प्रत्येक चौकात स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत सिंधी समाजसह विविध पक्षाचे राजकीय नेते, नागरिक यात्रेत सहभागी होऊन एकतेचा संदेश देतात. हिंदू धर्मातील देवदेवतांचे रथ यात्रेत सजविले जात असून सिंधी सांस्कृतीची झलक यानिमित्ताने शहरवासीयांना अनुभवास मिळते. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना जेवण, नाष्टा, पाणी, थंड पेय आदींची सुविधा यात्रे महोत्सव समितीकडून केली आहे.