VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

By पंकज पाटील | Published: September 16, 2024 10:31 PM2024-09-16T22:31:00+5:302024-09-16T22:32:39+5:30

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

Bike rider hit by dumper in Ambernath, incident caught on CCTV; Watch the VIDEO | VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली आहे. यात केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार वाचला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एका मागोमाग एक दोन डंपर डावीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार अचानक मागच्या डंपरच्या चाकाखाली आला. यात त्याच्या दुचाकीवरून डंपरची दोनही चाके गेल्याने दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार यातून सुखरूप बचावला.



ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. या घटनेनंतर डंपर मालकाने दुचाकीस्वाराला नुकसान भरपाई दिल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

Web Title: Bike rider hit by dumper in Ambernath, incident caught on CCTV; Watch the VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.