दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:22+5:302021-08-19T04:44:22+5:30

----------------------------- कॅमेरा चोरीला डोंबिवली : सोनारपाडा येथे राहणारे दिगंबर गवाड यांचा गोळवली येथे रिया फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओ ...

Bike theft | दुचाकी चोरी

दुचाकी चोरी

Next

-----------------------------

कॅमेरा चोरीला

डोंबिवली : सोनारपाडा येथे राहणारे दिगंबर गवाड यांचा गोळवली येथे रिया फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओ छताचे पत्रे फोडून चोरट्याने तेथील कपाटातील २८ हजार रुपये किमतीचा कॅमेरा आणि फ्लॅश लाईट आदी सामान चोरून नेले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------

सोनसाखळी लंपास

डोंबिवली : पूर्वेकडील दत्तनगर येथे राहणाऱ्या शारदा सूर्यवंशी या ७० वर्षीय महिला मधुबन गल्ली येथून मंगळवारी सकाळी ११ वाजता पायी जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी शारदा यांना मोफत धान्य देण्याचे आमिष दाखविले. यावेळी बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हातचलाखीने चोरून नेली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------

घरफोडीत ६८ हजारांचा मुद्देमाल चोरीला

डोंबिवली : अटाळी गावातील भगत चाळीत राहणारे अजय तिवारी यांच्या बंद घराच्या खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री घरात प्रवेश केला. तेथील कपाट फोडून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------------

युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

डोंबिवली : शिवसेना पक्षातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेना कल्याण जिल्हा सचिवपदी राहुल श्रीधर म्हात्रे यांची तर सागर रवींद्र जेधे यांना डोंबिवली शहर अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सागर दुबे यांना डोंबिवली विधानसभा अधिकारी हे पद देण्यात आले आहे. सागर जेधे हे मनसेत असताना त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष पद होते. दरम्यान मनसेला सोडचिठ्ठी दिल्यावर शिवसेनेत त्यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी मिळाली आहे.

-------------------------------

४५ कोरोना बाधितांची भर

कल्याण : कल्याण डोंबिवलीत मंगळवारी नव्या ४५ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. रूग्णालयात दाखल असलेले ८२ रूग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. नव्या रूग्णांची भर पडल्याने सद्यस्थितीला ४५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत १ लाख ३७ हजार २६ इतके रूग्ण बरे झाले आहेत.

------------------------------------------

आज लसीकरण नाही

कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने गुरूवारी केडीएमसी परीक्षेत्रातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहीती वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

---------------------------

जागतिक छायाचित्रकारिता दिनी लसीकरणाची सुविधा

डोंबिवली: मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांच्या वतीने जागतिक छायाचित्रकारिता दिनाचे औचित्य साधत डोंबिवली कल्याण फोटो ग्राफिक सोसायटीचे फोटो ग्राफर्स बंधू आणि भगिनींना गुरूवारी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत कोविशिल्ड लस मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृह याठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची संस्थेचे अध्यक्ष विवेक भणगे यांनी दिली.

-----------------------------

Web Title: Bike theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.