मोबाईलचे दुकान चालवणारे निघाले दुचाकी चोर; ६ दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:02 PM2018-09-06T21:02:08+5:302018-09-06T21:09:17+5:30
मोबाईल दुकान चालवणा-या दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत.
मीरारोड - मोबाईल दुकान चालवणारया दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनां मुळे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटला गुन्ह्यांचा तपास सोपवला होता. या प्रकरणी भार्इंदर पुर्वेच्या एका दुचाकी चोरी प्रकरणात पोलीसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे आढळुन आले. त्यातील एक चोरटा हा भार्इंदरच्या नवघर मार्ग भागात राहणारा लक्ष्मण जेठाराम सोळंकी ( २६ ) असल्याची माहती पो.ना. संजय शिंदे यांना खबरी मार्फत मिळाली.
आरोपीची ओळख पटताच सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर सह वेळे, वाडिले, पोशीरकर, पंडित, गर्जे, जाधव आदिंच्या पथकाने आधी सोळंकीला अटक केली. त्या नंतर नालासोपारा येथून मुख्य आरोपी पांडु भवानीसिंग राजपुत (२६) याला नालासोपारा येथुन पकडले. २०१६ पासुन दोघे चोरया करत होते. नवघर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे ५ गुन्हे या दोघांनी केले आहेत.
आरोपीं कडुन चोरीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. राजपुत व सोळंकी यांचे नालासोपाराच्या तुळींज भागात मोबाईलचे दुकान आहे. राजपुत याने स्वत:ची पल्सर गावी ठेवली होती. त्या गाडीची झेरॉक्स देऊन व नंबर चोरीच्या पल्सर ना लाऊन त्या ३० ते ३५ हजारात विकत असे. दोघांनी चार जणांना चोरीच्या पल्सर विकल्या आहेत.
सोळंकी हा रात्रीच्या वेळी भार्इंदर भागात फिरायचा व हँडल लॉक नसलेली पल्सर हेरायचा. राजपुतला बोलवुन मग त्याचा स्वीच काढुन ते गाड्या चोरत होते.