रस्त्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी

By admin | Published: June 25, 2017 04:00 AM2017-06-25T04:00:26+5:302017-06-25T04:00:26+5:30

ठाणे महापालिकेमार्फत तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत म्हणजेच २० वर्षे शहरात विविध रस्ते व फुटपाथ तयार केले.

Billions of billions of roads in the streets | रस्त्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी

रस्त्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेमार्फत तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापासून आजपर्यंत म्हणजेच २० वर्षे शहरात विविध रस्ते व फुटपाथ तयार केले. परंतु, हे रस्ते आणि फुटपाथ विकसित करीत असताना पालिकेकडे कोणत्याही प्रकारचे निकष अथवा नियमच नसल्याची माहिती ठाण्यातील दक्ष नागरिकाला माहिती अधिकारात मिळाली आहे. त्यामुळे २० वर्षे पालिकेने या कामांवर नियमबाह्यरित्या कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
महापालिकेचा मंजूर विकास आराखड्याला आता २० वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता नव्याने तो करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानुसार रस्ते, फुटपाथ, मिसिंग लिंक आधीच विकसित करण्याचे प्रयोजन करण्यात येत आहे. चालण्यासाठी फुटपाथ मिळावेत, वाहनांसाठी चांगले रस्ते असावेत या उद्देशाने पालिकेन २० वर्षात अशा प्रकारे रस्ते व फुटपाथवर कोट्यवधींचा खर्च केला आहे.
रस्ते, फुटपाथ विकसित करताना ते कसे असावेत, तेथे कोणत्या सोई सुविधा असाव्यात, अंध अंपगांसाठी कशी सुविधा उपलब्ध करुन देता येऊ शकते असे काही महत्त्वाचे निकष अथवा नियम असणे अपेक्षित होते. परंतु, या नियम किंवा निकषानुसार कामेच झाली नसल्याची माहिती दक्ष नागरिक प्रदीप इंदूलकर यांना माहिती अधिकारात पालिकेनेच दिली आहे. विकास आराखड्याव्यतिरिक्त जे काही रस्ते अथवा फुटपाथ तयार केले आहेत, त्यासाठी कोणत्याचे प्रकारचे निकष अथवा नियम केलेले नाहीत, केवळ आवश्यकतेनुसार ही कामे केल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची नियमांची अथवा निकषांची प्रतच उपलब्ध नसल्याचेही पालिकेने सांगितले आहे.

Web Title: Billions of billions of roads in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.