कोट्यवधीची फसवणूक; १८०५ पानी दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:38 AM2018-06-02T01:38:18+5:302018-06-02T01:38:18+5:30

गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीच्या मुख्यसूत्रधारासह चौघांविरोधात ठाणे

Billions of frauds; 1805 Water accusation | कोट्यवधीची फसवणूक; १८०५ पानी दोषारोपपत्र

कोट्यवधीची फसवणूक; १८०५ पानी दोषारोपपत्र

Next

ठाणे : गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीच्या मुख्यसूत्रधारासह चौघांविरोधात ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १,८०५ पानी पुरवणी दोषारोपपत्र बुधवारी कल्याण विशेष न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये ३ हजार १०० गुंतवणूकदारांची एकूण १५९ कोटी ७८ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून त्या संबंधित पुरावे जोडले आहेत.
फसवणुकीप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग झाल्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात सुहास समुद्र आणि सुनिता या दोघांना अटक केली होती. तर, सध्या ते दोघे जामिनावर असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. तसेच सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीचे व्यवस्थापनाचे काम सुहास समुद्र यांचा मुलगा श्रीराम आणि त्याची सून अनघा पाहत होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीराम यांच्यासह काही जण फरार झाले होते. दरम्यान, त्यांनी जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर श्रीराम याच्यासह त्यांची पत्नी अनघा आणि काकू सुप्रिती तसेच चुलत भाऊ कैव्यल्य या चौघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत कल्याण येथील एका बँकेत श्रीराम याच्या खात्यात ५ लाख असल्याचे समोर आल्यावर ते पैसे गोठवले. चौकशीत त्या चौघांनी ३ हजार १०० गुंतवणूक दारांना १५९ कोटी ७८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी दिली. तर, त्यांच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या सर्व पुरावे म्हणून पुरवणी दोषारोपपत्रात जोडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेनंतर बदलापूरमधील सागर हाउसमध्ये छापा मारून घरातील दोन संगणकामधील हार्डडिस्क पोलिसानी जप्त केल्या होत्या.
कल्याण येथील एका बँकेत श्रीराम याच्या खात्यात ५ लाख रुपये असल्याचे समोर आल्यावर ते पैसे गोठवले.

Web Title: Billions of frauds; 1805 Water accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.