बिल थकवल्याने टाउन हॉल अंधारात, वर्षभराचे १३ हजार भरणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:40 AM2018-02-09T02:40:36+5:302018-02-09T02:40:45+5:30

ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या ऐतिहासिक टाउन हॉलचे ११ महिन्यांचे विजेचे १३ हजार ३० रुपयांचे बिल गेले वर्षभर न भरल्याने सात दिवसांपासून या हॉलची वीज महावितरणने कापली आहे.

With the bills of the bills, it is difficult to fill the Town Hall in the dark, 13 thousand rupees a year | बिल थकवल्याने टाउन हॉल अंधारात, वर्षभराचे १३ हजार भरणे कठीण

बिल थकवल्याने टाउन हॉल अंधारात, वर्षभराचे १३ हजार भरणे कठीण

Next

ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या ऐतिहासिक टाउन हॉलचे ११ महिन्यांचे विजेचे १३ हजार ३० रुपयांचे बिल गेले वर्षभर न भरल्याने सात दिवसांपासून या हॉलची वीज महावितरणने कापली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका व कार्यक्रम आठवडाभर अंधारातच उरकण्यात आले. रविवारपासून एका प्रदर्शनाला हा हॉल दिल्यामुळे बिल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाण्यात टाउन हॉलला खास महत्त्व आहे. १९२७ साली बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू जिल्हाधिकाºयांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या वास्तूचे २०१५ मध्ये नूतनीकरण करून सांस्कृतिक केंद्रात रूपांतर करण्यात आले. नूतनीकरणानंतर हॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, गेल्या वर्षभरापासून विजेचे बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने ‘महावितरण’ने शुक्रवार, २ फेब्रुवारीला टाउन हॉलची वीजजोडणी कापली. १५ मार्च २०१७ ला टाउन हॉलचे शेवटचे बिल भरण्यात आले. त्यानंतर, आजतागायत एकही बिल भरण्यात आले नसून आतापर्यंतची थकीत रक्कम १३ हजार ३० रुपये असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. शुक्रवारी बिग आर्ट इन्स्टिट्यूटनेचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन रविवार, ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने महावितरणला मेल करून बिल भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने टाउन हॉलची वीज जोडण्याची मागणी केली.
निवासी जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, असे व्हायला नको. मात्र, मी वस्तुस्थिती विचारून सांगते.
>सार्वजनिक बांधकामच्या निष्काळजीपणाचा फटका
सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या निष्काळजीपणामुळे टाउन हॉलचा विद्युतपुरवठा काही दिवसांपासून खंडित झाला आहे. १३ हजार रुपयांचे थकीत वीजबिल वेळेत न भरल्यामुळे वीज कापली आहे. यामुळे सभा, बैठकांसह विविध संमेलनांसाठी विजेशिवाय हॉल वापरण्यात येत होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी ढकलत आहेत. या हॉलच्या वापरासाठीचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉलचा वीजपुरवठा खंडित होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणे, यात जिल्हाधिकारी कार्यालयाची काहीच चूक नाही, हे म्हणणे योग्य नसल्याची चर्चा बांधकाम विभागातील कर्मचाºयांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Web Title: With the bills of the bills, it is difficult to fill the Town Hall in the dark, 13 thousand rupees a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.