भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचे आरोप बिनबुडाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:28+5:302021-07-14T04:44:28+5:30
ठाणे : वर्तकनगर येथील समाज मंदिर सभागृहाचे भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप वर्तकनगर समाज मंदिर संघर्ष समितीने केला होता. परंतु, ...
ठाणे : वर्तकनगर येथील समाज मंदिर सभागृहाचे भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप वर्तकनगर समाज मंदिर संघर्ष समितीने केला होता. परंतु, तो चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेने केला आहे.
ठाणे हद्दीतील वर्तकनगर येथील कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा मौजे माजिवडे, सेक्टर नं. ४, वर्तकनगर, ठाणे येथील इमारत क्र. ६९ शेजारील भुखंडाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार केला आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूर्तता केलेल्या आहेत. याबाबत दाखल दावाही न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०१३ रोजी हा दावा फेटाळलेला असल्याचे सांगण्यात आले.
तसेच म्हाडाच्या बहुतांश भुखंडांवर अतिक्रमण झालेले तसेच बऱ्याच जागांवर समाजकंटकांनी झोपड्यांसह मंदिरेही बांधली आहेत.